You are currently viewing स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय जीवनापासूनच करा

स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय जीवनापासूनच करा

*कलेक्टर झालेल्या मुलांनी उपस्थितांना दिला कानमंत्र*

 

*मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी दिल्या शुभेच्छा*

 

अमरावती दि. 7 :  शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर स्पर्धा परीक्षेमध्ये लवकर यशस्वी होता येते. त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष देऊन शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास प्रारंभ करावा. ही तयारी केल्यामुळे मुलांचे व्यक्तिमत्व चांगले विकसित होते व तो ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रामध्ये भरारी घेऊ शकतो असे प्रतिपादन आज यावर्षी आय ए एस झालेल्या विद्यार्थ्यांनी अमरावती येथे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत बोलताना काढले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात ते बोलत होते. अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा डॉक्टर पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमीच्या मिशन आयएएस युवा संवाद प्रतिष्ठान व पुणे येथील स्व.रवीन्द्र जाधव गलोबल फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन अमरावतीच्या अभियंता भवन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध समाजसेविका माजी लेडी गव्हर्नर व सर्वोच्च न्यायालयाचे सर सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई गवई ह्या उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात सर्वश्री रजत पत्रे डॉ. जयकुमार आडे कुमारी नम्रता ठाकरे कुमारी अश्विनी धामणकर मोहिनी खंडारे यांचा स्मृतिचिन्ह शाल व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय अमरावती यांच्यावतीने श्री महेश डांगे यांनी सर्व आयोजित झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर मोझरीच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळतर्फे प्रत्येक कलेक्टर झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रामगीता देऊन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ चे सचिव श्री जनार्दन पंत बोथे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण मुख्य सचिव श्री विकास खारगे व अमरावती महानगरपालिका आयुक्त श्री सचिन कलंत्रे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा गेल्या. तसेच डागा सफायरचे श्री राजेश डागा यांच्यावतीने देखील स्मृतिचिन्ह व ड्राय बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिजाऊ कमर्शियल बँकेचे अध्यक्ष श्री अविनाश कोठाळे उपाध्यक्ष श्री चौधरी व त्यांच्या चमुने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचा पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात सर्वश्री प्राचार्य डॉक्टर व्हि.टी. इंगोले यांनी केलेल्या 37 पॅटर्नच्या सन्मानार्थ त्यांचा सत्कार मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांच्या हस्ते करण्यात आला. अमरावतीच्या अभियंता भवनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते. कलेक्टर झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व विचारपिठावरील मान्यवरांचा सन्मान युवा संवाद प्रतिष्ठानचे श्री नितीन पवित्रकार व मिशन आय ए एस.चे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे अध्यक्ष श्री डी व्ही मोडक कार्यकारिणी सदस्य व विभागीय संचालक श्री श्रीकांत कुकडे तुमसर श्री संजय काशीवार देवरी प्रा. पल्लवी एरूळकर खामगाव चे श्री श्रीधर जाधव यांनी केला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती शुभांगी दाभाडे यांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले तर स्वागत पर भाषण स्वागताध्यक्ष व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री गजाननराव पुंडकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी मिशन आयएएस युवा संवाद प्रतिष्ठान व स्व.रवीन्द्र जाधव ग्लोबल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी स्टेजवर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना डागा सफायरचे संचालक श्री राजेश डागा यांच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री अरविंद राठोड यांच्या गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनेने झाली तर कार्यक्रमाचा समारोप श्री अरविंद राठोड यांच्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या सामुदायिक प्रार्थनेने झाली. याप्रसंगी सर्वश्री रजत पत्रे डॉ. जयकुमार आडे डॉक्टर अश्विनी धामणकर कुमारी नम्रता ठाकरे व कु. मोहिनी खंडारे या कलेक्टर झालेल्या विद्यार्थ्यांनी व श्रीराम पत्रे कमलताई गवई राजेश डागा महेश डांगे प्रा. तट्टे. प्रा. मिलिंद लाहे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल चाणक्य फाउंडेशनचे प्राध्यापक मिलिंद लाहे विदर्भ आय ए एस अकादमीचे श्री सागर भस्मे युनिक अकादमीचे प्रा. अमोल पाटील व मिशन आय ए एस च्या आयोजनाच्या संचालिका प्रा. पल्लवी येरुळकर यांचाही सत्कार करण्यात आला.तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सर्व आयएएस विद्यार्थ्यांनी दिली. तुम्हारे चार तास 15 मिनिटे चाललेल्या या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्षणीय उपस्थिती होती. याच कार्यक्रमात यावर्षी कलेक्टर झालेले कु. शक्ती दुबे अर्जित डोंगरे, मोहिनी सूर्यवंशी रोशन कच्छवा श्रीतेज पाटील डॉ. पंकज पटले अभय देशमुख कुमारी आदिबा अनम यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या अनुपस्थितीत मिशनच्या कार्यकर्त्यांनी तो सत्कार स्वीकारला. जळगाव भागातील सन्मानपत्रे जळगाव जिल्ह्याचे मिशनचे विभागीय समन्वयक श्री प्रवीण पवार यांनी स्वीकारली. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. त्यासाठी गौरी इन या हॉटेलचे संचालक श्री सचिन हिवसे व फार्म हाऊस या कृषी पर्यटन केंद्राचे श्री प्रफुल्ल सावरकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमामुळे उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली असून त्यांना कलेक्टर होण्यासाठी हा कार्यक्रम निश्चितच उपयोगी पडेल असा अभिप्राय उपस्थितांनी व्यक्त केला आहे

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती कम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा