You are currently viewing जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान

*भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा*

वेंगुर्ला :

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वायगणी (ता. वेंगुर्ला) डाॅ.किर्लोस्कर बंगला येथे भाजप किसान मोर्चा – सिंधुदुर्ग यांच्या वतीने “कासवमित्र” कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी कासव संवर्धनासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या ६ जणांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

सन्मानित कासवमित्रांची नावे पुढीलप्रमाणे :

१. सुहास विठ्ठल तोरसकर

२. प्रकाश नारायण साळगावकर

३. संतोष सावळाराम साळगावकर

४. गोरेश नंदकिशोर खडपकर

५. चंद्रशेखर बलराम तोरसकर

६. प्रकाश लक्ष्मण सागवेकर

या कार्यकर्त्यांनी समुद्रकिनारी नित्यनेमाने येऊन कासवांचे रक्षण करण्याचे कार्य निःस्वार्थपणे केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे जैवविविधतेचे संरक्षण शक्य झाले असून निसर्गाची शाश्वत जपणूक घडविण्यात ते मोलाचा वाटा उचलत आहेत, असे मत किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील यावेळी व्यक्त केले.

तसेच गेली १५ ते २० वर्षे हे कासवमित्र अंड्यांची जीवापाड जपणूक करतात. त्यामुळेच कासवाचा नैसर्गिक प्रजनदर ४० % वरुन ७५ % वर पोहचला आहे. ह्याचे सर्व श्रेय हे या कासवमित्रांचे आहे, असे प्रतिपादन सत्कार प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले. तर या कासवमित्रांची दखल राज्यस्तरावर घेतली जाईल असे प्रतिपादन जेष्ठ नेते राजु राऊळ यांनी केले.

या कार्यक्रमात भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गचे जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, जेष्ठ नेते राजु राऊळ, मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर, किसान मोर्चा कुडाळ अध्यक्ष वैभव शेणई, किसान मोर्चाचे बापु पंडीत व आनंद ऊर्फ बिट्टु गावडे, ओंकार चव्हाण, चेअरमन प्रशांत खानोलकर, वायंगणी उपसरपंच रविंद्र धोंड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी प्रत्येक कासवमित्रांना सन्मानपत्र व शाल व पुष्प देऊन गौरव केला आणि पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला समुद्रकिनाऱ्याचे आणि कासव रक्षणाच्या कार्याचे महत्त्व सांगणारी माहिती मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी दिली. “समुद्राचा किनारा साक्ष देतो, एक वाटसरू नित्यच येतो, कासवांचे पंख असो की पाय, त्यांचं रक्षण करणारा देवच ठरतो!” या ओळींनी सन्मानपत्राची सुरुवात झाली आणि वातावरण भारावून गेले.

या सन्मानामुळे कासव संरक्षणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळाली असून स्थानिक पातळीवर पर्यावरण जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

यावेळी वायंगणी ग्रामपंचायत सदस्य अनंत केळजी, विद्या गोवेकर, राखी धोंड, सविता परब, दाभोली ग्रामपंचायत सदस्य अवधुत राऊत, शेखर येरागी, सुनील खोबरेकर, संजय येरागी, रमेश खोबरेकर, नरहरी तोरसकर, सचिन खडपकर, जयेंद्र येरागी, हरिश्चंद्र म्हाकले, घनश्याम तोरसकर, प्रदिप म्हाकले, रितेश म्हाकले, भालचंद्र तोरस्कर, प्रसाद पेडणेकर, उमेश सारंग, विनायक कामत, सुर्यकांत सागवेकर, गोपाळ तारी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा