You are currently viewing नॅब सिंधुदुर्ग तर्फे दृष्टीबाधितांसाठी स्नेह मेळावा संपन्न

नॅब सिंधुदुर्ग तर्फे दृष्टीबाधितांसाठी स्नेह मेळावा संपन्न

नॅब सिंधुदुर्ग तर्फे दृष्टीबाधितांसाठी स्नेह मेळावा संपन्न

सावंतवाडी

नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईड सिंधुदुर्ग सावंतवाडी यांच्या तर्फे रविवार दिनांक १ जुन २०२५ रोजी ११.३० वाजता नॅब नेत्ररुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील नॅब सभागृहामध्ये हेलन केलर यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ सिंधुदुर्गातील दृष्टीबाधितांचा स्नेह मेळावा भरवण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॅन्क ऑफ इंडीयाचे निवृत्त शाखाधिकारी मा. श्री. नंदकुमार प्रभुदेसाई हे उपस्थित होते. आपल्या भाषणातून त्यांनी मार्गदर्शनपर व सकारात्मक विचार मांडले. दृष्टीबाधितांनी आपले विचार सकारात्मक ठेवावे, नवनविन कौशल्य आत्मसात करावे, नवनविन गोष्टींबाबत माहिती करून घ्यावी, ब्रेल लीपी सगळयांनी शिकून घ्यावी, समाज तुमच्या बरोबर आहे याची खात्री बाळगा. न्याय हक्क मिळवा, कर्तव्य विसरू नका, कष्टाला प्राधान्य दया. दृष्टीबाधितांनी जगण्याचे कौशल्य जाणून घेऊन आपली प्रगती साधावी, शिक्षण व्यवसाय महत्वाचा आहे. कष्टांनी तुमचा कठीण काळ बदलेल याची खात्री बाळगा. सामाजीक बांधिलकीची जाणीव असणारा समाज तुमच्या बरोबर कायम असणार याची खात्री बाळगा. नॅब ही संस्था आपल्यासठी सर्वतोपरी भरीव असे कार्य करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
नॅब अध्यक्षांनी पाहुण्यांचा परिचय व नॅब सिंधुदुर्ग च्या एकंदरीत प्रगतीचा आढावा घेतला. नॅब नेत्र रुग्णालय गोरगरिबांसाठी नेत्र तपासणी, शस्त्रक्रीया अगदी परवडणाऱ्या दरात करते याबद्दल अध्यक्षांनी सविस्तर माहिती दिली. नॅब सचिव यांनी प्रास्ताविक केले. तर नॅब च्या खजिनदार श्रीम. विनया बाड यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. सुहास नायडु, श्री. सुहास सातोसकर, श्री. प्रविण परब, डॉ. स्नेहल गोवेकर, श्री. रामदास पारकर व दृष्टीबाधीत लाभार्थी उपस्थित होते.
खजिनदार यांनी आभारप्रदर्शन केल्यानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. अशाप्रकारे स्नेह मेळाव्याची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा