You are currently viewing शिक्षक समिती कणकवलीचे ३ एप्रिल रोजी त्रैवार्षिक अधिवेशन

शिक्षक समिती कणकवलीचे ३ एप्रिल रोजी त्रैवार्षिक अधिवेशन

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीचे आवाहन

कणकवली

दर तीन वर्षांनी संघटनात्मक त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यात येते. कणकवली तालुका शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन रविवार ३ एप्रिल रोजी मराठा मंडळ कणकवलीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

तरी या अधिवेशनाला कणकवली तालुक्यातील सर्व समिती शिलेदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष विनायक जाधव , महिला अध्यक्षा निकिता ठाकूर , तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज , महिला सचिव नेहा मोरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. उदघाटक म्हणून राज्याध्यक्ष उदय शिंदे , राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यावेळी समितीच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. दत्तक विद्यार्थी , सेवानिवृत्त शिक्षक , पुरस्कारप्राप्त शिक्षक , विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. सकाळ सत्रामध्ये उपस्थित मान्यवर यांचे संघटनात्मक मार्गदर्शन होणार आहे. दुपार सत्रामध्ये सन २०२२ ते २०२५ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षकांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम व शिक्षक समितीच्या कलाकारांचे महान पौराणिक दशावतारी नाटक भ्रमरासुर वध हे सादर होणार आहे.

या कार्यक्रमाला कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , समिती जिल्हाध्यक्ष नितीन कदम , जिल्हा सरचिटणीस सचिन मदने , ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण , चंद्रकांत अणावकर , राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर , राज्य विभागीय उपाध्यक्ष शरद नारकर , राज्य कार्यकारिणी सदस्य डी.बी.कदम , राज्य महिला आघाडी सल्लागार सुरेखा कदम , शिक्षक नेते नंदकुमार राणे , जिल्हा प्रवक्ते सुनिल चव्हाण , कार्याध्यक्ष नारायण नाईक , उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे , उपाध्यक्ष लवू चव्हाण , शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस , कोषाध्यक्ष लवू दहिफळे , पतपेढी संचालक आनंद तांबे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + five =