*शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांच्या वाढदिनी मा.आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार*
सिंधुदुर्ग
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा वाढदिवस मित्रमंडळ व सहकाऱ्यांच्या वतीने महादेवाचे केरवडे येथील श्री सिध्द महादेव मंदिरात सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून कृष्णा धुरी यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आयोजित केलेल्या दशावतारी नाटकाचा शुभारंभ वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, पप्पू ताम्हाणेकर, स्वप्नील शिंदे, तुषार परब,सुधीर राउळ,रुपेश धारगळकर, पिंट्या उभारे,बाबी निकम, निलेश सावंत,श्री. निकम,सचिन कविटकर,बाळकृष्ण नेवगी,श्रीकृष्ण नेवगी,विजय परब,अमर आपणकर, मधुकर परब, एकनाथ धुरी आदींसह कृष्णा धुरी मित्रमंडळाचे सहकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.