You are currently viewing भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजनेसाठी 15 जूनपासनू अर्ज सादर करावेत

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजनेसाठी 15 जूनपासनू अर्ज सादर करावेत

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजनेसाठी 15 जूनपासनू अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी

 शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती व व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता योजनेचे  नवीन अर्ज नोंदणी करणे व नुतनीकरण अर्ज नोंदणी करण्याची सुरुवात 15 जून  पासून महाडिबीटी  पोर्टलवर  https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील  सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी.

अ.क्र  शैक्षणिक स्तर अर्जाचा प्रकार प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेषित करण्याकरीता प्रस्तावित मुदत (संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्य यांचे करीता)
1 कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम (उदा.इ.11वी, 12वी (सर्वशाखा),

इ.11 वी,12वी MCVC, ITI इ. )

नवीन अर्ज दि. 15 जून  ते दि. 15 ऑगस्ट 20025 पर्यंत
नुतनीकरणाचे अर्ज दि. 15जून  ते दि. 15 ऑगस्ट 20025 पर्यंत
2 वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम (उदा. प्रथम, व्दितीय व तृतीय (सर्व शाखा-कला, वाणिज्य, विज्ञान इ.) नवीन अर्ज दि. 15जून  ते दि. 10 सप्टेंबर 20025 पर्यंत
नुतनीकरणाचे अर्ज दि. 15जून  ते दि. 10 सप्टेंबर 20025 पर्यंत
3 वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम (उदा. प्रथम, व्दितीय, तृतीय, अंतिम वर्ष)(सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अभ्यासक्रम, फार्मसी व नर्सिंग अभ्यासक्रम इ. ) नवीन अर्ज दि. 15 जून  ते दि. 15 नोव्हेंबर 20025 पर्यंत
नुतनीकरणाचे अर्ज दि. 15जून  ते दि. 15 नोव्हेंबर 20025 पर्यंत

       अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनेच अर्ज नोंदणी करण्याबाबत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेवून परिपत्रक शाळा / महाविद्यालयांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागात लावण्याविषयी व महाविद्यालयाच्या परिसरात बॅनर लावून प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी सर्व महाविद्यालयांना व  अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज वरील  वेळापत्रकानुसार दि.15 जून 2025 पासून महाडिबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in  ऑनलाईन सादर करावेत. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहिल. तरी अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्याबाबत व महाविद्यालय स्तरावर अर्जांची छाननी करून प्रस्ताव मंजुरीसाठी  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  कार्यालयाकडे वेळापत्रकानुसार पाठविण्याबाबत महाविद्यालयांना सूचित करण्यात येत आहे. या योजनेपासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहिल्यास यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील, असे पत्रकात नमूद असल्याचे समाज कल्याण कार्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा