*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बरसात*
*********
आज निरव निवांत क्षणी
बरसात तुझ्या आठवांची
महापूर साराच भावनांचा
व्याकुळी गाज सागराची….
ओघळती स्वर काळजात
अंतरी गीते प्रीतभावनांची
कसे उकलावे मनांतराला
उलघाल होते या जीवाची….
नि:शब्दात गूढ पावित्र्याचे
झूळझूळ सुरेल निर्झराची
आज निरव निवांत क्षणी
बरसात तुझ्या आठवांची….
***********************
*( 52)*
*©️ वि. ग. सातपुते. ( भावकवी )*
*📞( 9766544908 )*