You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा नवनियुक्त पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांना शुभेच्छा..

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा नवनियुक्त पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांना शुभेच्छा..

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल होऊन त्यांनी श्री. दहीकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजीराव घोगळे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नजीरभाई शेख, रुपेश जाधव नयन गावडे, राजन वालावलकर, प्रशांत पाताडे,अक्षय मराठे, रविंद्र गावडे, गौरव गावडे, चंद्रकांत नाईक यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा