प्रेम

प्रेम

प्रेम

प्रेम असते,
आईच्या मायेने भरलेले..
तिच्या गोड आवाजातील,
अंगाईतून सजलेलं.
प्रेम असते बहिणीच्या,
हट्टात रुसलेलं,
छोट्या भावाच्या,
रागात हसलेलं.
प्रेम करायचं स्वतःवर,
उधळायचं तर ते फक्त,
आपल्याच माणसांवर.
प्रेम हृदयात जपायचं,
तिच्या डोळ्यात पहायचं.
हृदयाच्या कोपऱ्यात,
साठवून ठेवायचं.
प्रेम रुजवायचं,
नाही फक्त गाजवायचं.
स्वतः बरोबर दुसऱ्यांच्या,
मनात फुलवायचं.
प्रेम नसतं कधी,
ओठांवर आणायचं…
शब्दातून व्यक्त व्हायचं,
नाही नजरेत दाखवायचं.
प्रेम…
आपल्याच मनात,
खोलवर….
दडवून ठेवायचं.
न सांगताच….
न बोलताच….
समजण्यासाठीच….!!

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा