सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 100 मि.मी. पावसाची नोंद
वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाची संततधार कायम आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 99.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस वेंगुर्ला तालुक्यात 167 मिमी कोसळला.
तर कुडाळ 114 मिमी, कणकवली 112 मिमी, देवगड 106 मिमी, सावंतवाडी 102 मिमी, वैभववाडी 92 मिमी, मालवण 58 मिमी, दोडामार्ग 45 मिमी अश्या स्वरूपात एकूण 796 मिमी तर सरासरी 99.5 मिमी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे
