मंगेश तळवणेकर यांच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये सॅनिटायझर व मास्क वाटप…

मंगेश तळवणेकर यांच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये सॅनिटायझर व मास्क वाटप…

सावंतवाडी

माजी शिक्षण आरोग्य सभापती, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी पुढाकार घेत आज कारीवडे- कुंभारवाडी शाळा नं.१,पेडवेवाडी शाळा नं.२,भैरववाडी शाळा नं.३,कट्टा शाळा नं.४,गोसाविवाडी शाळा नं ५ या सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये प्रत्येकी ५ लीटर सॅनिटायजर कॅन व मास्क वाटप केले. यावेळी कारिवडे गावच्या सरपंच अपर्णा तळवणेकर, उपसरपंच आलेक्स कोजमा गोम्स, लक्ष्मण गांवकर, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य दादा राऊळ, मंगेश पंदारे, शंभा खडपकर, रामचंद्र पालव, सत्यवान लिंगवत आदी उपस्थित होते प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा शाळा पुर्वपदावर येऊ पाहत आहेत. यातच संभ्रमावस्थेत असलेल्या पालक व विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत जाण्याविषयी धाकधूक निर्माण झाली आहे. शाळा सुरू करण्याविषयी पहिले सकारात्मक पाऊल शासनाकडून उचलण्यात आल्यानंतर विद्यार्थी व पालकांकडून याला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सर्व नियमांचे पालन करत, स्वसंरक्षण करत शाळेत येता यावे यासाठी माजी शिक्षण आरोग्य सभापती, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी पुढाकार घेत मास्क व सॅनिटायजर वाटप सुरू केले आहे. या उपक्रमाची सुरुवात सोनूर्ली शाळा नं. १ पासून झाली होती. कोणीही घाबरून न जाता, विद्यार्थ्यांवर दबाव न टाकता, सर्व नियमांचे पालन करत शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा