*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्राण्यांची शाळा*
एकदा भरली
प्राण्यांची शाळा.
सगळे प्राणी
झालेत गोळा.
उंदीरमामा आले
नेसून लुंगी.
भिऊन पळाली
छोटीशी मुंगी.
हत्तीदादा आले
घालून कोट.
तरी त्यांचे होते
उघडेच पोट.
मनीमाऊ आली
मॅक्सी घालून.
शाळेत आली
ऐटीत चालून.
शाळेत आली
कोकीळाताई.
शाळेत सदा
गाणीच गाई.
डराव डराव करीत
बेडुकराव आले.
वैतागून प्राणी
पळूनच गेले.
अनुपमा जाधव (कवयित्री)