You are currently viewing पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे  गुरुवार दि.15 ते 16 फेब्रुवारी 2024  रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार  दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6.40 वाजता कणकवली  रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, कणकवलीकडे प्रयाण. सकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वाजता कणकवली  येथून देवगड जि. सिंधुदुर्गकडे  प्रयाण.  सकाळी 10 वाजता देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व स्वर्गीय माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्म शताब्दी कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक  भवन, जामसांडे ता. देवगड जि.सिंधुदुर्ग. सकाळी 11 वाजता देवगड जि. सिंधुदुर्ग येथून ओरोसकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस जि.सिंधुदुर्ग येथे आगमन व आंगणेवाडी यात्रोत्सव -2024 बाबत आढावा बैठक. स्थळ  समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 1 वाजता कुणकेश्वर यात्रोत्सव-2024 बाबत आढावा बैठक. स्थळ , समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 1.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांच्या विभगप्रमुखांची बैठक. स्थळ, समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 2 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता आंगणेवाडी येथे यात्रा कालावधीत मोबाईल टॉवर व वायफास सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक. स्थळ, समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग. दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘जल जिवन मिशन’ व जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची आढावा बैठक. स्थळ, समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग . दुपारी 3.30 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंधुदुर्ग आढावा बैठक. स्थळ, समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 4. वाजता रेल्वे स्टेशन सुशोभिकरण प्रकल्प आढावा बैठक. स्थळ, समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग दुपारी 4.30 वाजता कुडाळ व्यापारी संकुलाबाबत बैठक. स्थळ, समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सांय. 5 वाजता कृषी विभाग, सिंधुदुर्ग अंतर्गत कामांची आढावा बैठक. स्थळ, समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सांय. 5.30 वाजता वाळू धोरण व सिंधुदुर्ग जिल्हा महसूल यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. स्थळ, समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग.  सांय. 6 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. स्थळ, समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग. रात्री 8 वाजता  भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, कुडाळ तालुका आयोजित मकर सक्रांत विशेष “तिळगुळ महोत्सव” या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, भाजपा पक्ष कार्यालयासमोर कुडाळ जि.सिंधुदुर्ग .  रात्री 8.30 वाजता कुडाळ येथून सावंतवाडी कडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता केसरी ता.सावंतवाडी येथे आगमन व राखीव.

शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून ओरोस, जिल्हा सिंधुदुर्गकडे प्रयाण.  सकाळी 10.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा पदाधिकारी, मोर्चा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष व अभियान संयोजक यांच्या समवेत आढावा बैठक. स्थळ , पत्रकार भवन सभागृह ओरोस  जि. सिंधुदुर्ग. सकाळी 11.30 वाजता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तर बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती. स्थळ, इच्छापुर्ती हॉल, ओरोस जि.सिंधुदुर्ग. दुपारी 2.30 वाजता ओरोस येथून वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजा‍ता वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथे आगमन  “project Sindhuputra” या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, Araqila रिसॉर्ट, सागरतिर्थ बिच, आरवली, वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग. दुपारी 4.30 वाजता वेंगुर्ला येथून मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 2 =