You are currently viewing महिला कधीच रिटायर होत नाहीत – सौ. निलमताई राणे

महिला कधीच रिटायर होत नाहीत – सौ. निलमताई राणे

महिला कधीच रिटायर होत नाहीत – सौ. निलमताई राणे

देवगड व पडेल येथे महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

देवगड

महिलांना आयुष्यामध्ये अनेक भूमिका भूषवाव्या लागतात कधी ती मुलगी असते, कधी आई असते, कधी सासू असते, तर कधी आजी असते, महिलेला तिच्या कामातून कधीही रिटायर्ड होता येत नाही. मात्र महिलांनी यातूनही वेळ काढून आपल्या आयुष्य जगले पाहिजे. असे मत सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ निलमताई यांनी व्यक्त केले.

देवगड व पडेल येथे महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम स्थळी कणकवलीच्या माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, देवगड जमसंडे च्या माजी नगराध्यक्ष प्रियांका साळस्कर, नगरसेविका तनवी चांदोसकर, प्रणाली माने माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी, महिला नेत्या उश्यकला केळुस्कर, माझी जि प सदस्या मनस्वी घारे ,सावी लोके इत्यादी उपस्थित होत्या

यावेळी मेघा गांगण व तनवी चांदोस्कर यांनी आपले विचार मांडले या हळदी कुंकवाचा लाभ असंख्य महिलांनी घेतला

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + three =