You are currently viewing मराठा समाजाच्या ओरोस येथील लाक्षणिक उपोषणाला आ. वैभव नाईक यांचा पाठींबा

मराठा समाजाच्या ओरोस येथील लाक्षणिक उपोषणाला आ. वैभव नाईक यांचा पाठींबा

*वेताळबांबर्डे येथील मराठा समाजाच्या उपोषणात झाले सहभागी*

 

*जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांचा आ. वैभव नाईक यांनी केला जाहीर निषेध*

 

कुडाळ :

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले आहे. या उपोषणाला आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन पाठींबा दिला. त्याचबरोबर वेताळबांबर्डे येथे सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला देखील आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला.

 

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, राज्य सरकारने महिन्याभरात आरक्षण देण्याचे आश्वासन मराठा समाजाला दिले होते.मात्र आरक्षण न मिळाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. मात्र राज्य सरकार त्या उपोषणाकडे कानडोळा करत आहे. त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा बांधव आंदोलन छेडत आहेत. त्या आंदोलनाला आमचा सक्रिय सहभाग व पाठिंबा आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करण्याचे काम आता सत्ताधारी पक्षाचे लोक करत आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.कुणबीच्या माध्यमातून आरक्षण मिळत असेल तर ते घेण्यास मराठा बांधव तयार आहेत.त्यामुळे नारायण राणेंच्या भूमिकेशी आम्ही व्यक्तिशः सहमत नाही आणि मराठा समाज देखील त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत नाही असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक,अमित सामंत,बाळा गावडे,सचिन सावंत, अजित राऊळ,मथुरा राऊळ,सुदंर सावंत,संतोष परब,अनुप वारंग,सचिन काळप,तेजस राणे,निसार शेख,राजेश रावराणे,बंड्या सावंत, अजय सावंत,परशुराम सावंत,नितीन सावंत,धीरज परब,सदासेन सावंत,प्रकाश देसाई,सिद्धेश परब,नितीन सावंत,सुनील सावंत,वैभव जाधव, रुपाली पाटील,पुंडलिक दळवी,दत्तात्रय तावडे,शुभम सावंत,शैलेश घोगळे आदी

वेताळबांबर्डे येथे प्रसाद गावडे, आनंद भोगले,शैलेश घाटकर, प्रदीप गावडे,संतोष कदम, मंदार खोटावळे,सुशांत सावंत,साजुराम नाईक,चंद्रकांत गावडे,नारायण गावडे,दिलीप सावंत,स्नेहा दळवी,वेदिका दळवी, समृध्दी कदम, रमण गावडे,संदीप सावंत,आबा घाडी, हरिश्चंद्र कदम,संजय गावडे, बाबुराव चव्हाण, पापा परब ,दीपक कदम,प्रसाद सावंत आदिंसह बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 16 =