दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी…
दोडामार्ग
तालुक्यातील विविध भागांत आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जोरदार गडगडाटासह पाऊस कोसळल्याने रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहनचालकांना थांबून आसरा घ्यावा लागला. दुचाकी व इतर वाहनचालकांना मिळेल त्या ठिकाणी थांबून पावसापासून बचाव करावा लागला. सुमारे तीन तास हा पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.