You are currently viewing डोंबिवलीतील के. रा. कोतकर विद्यालयाचा निकाल ९९.०३ टक्के

डोंबिवलीतील के. रा. कोतकर विद्यालयाचा निकाल ९९.०३ टक्के

मुंबई :

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/ मार्च २०२५ निकाल जाहीर झाला असून यात डोंबिवली येथील उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित के.रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.१० वी चा निकाल ९९.०३ % लागला असून शाळेने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले.

शाळेचा निकाल पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक

कु. भोसले तनुश्री प्रल्हाद ९०.८०%

 

द्वितीय क्रमांक

कु. डासाळ साक्षी दत्तात्रय ८९.८०%

 

तृतीय क्रमांक

कु. खैर देविका वैभव ८७.८०%

 

एकूण १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

आजचे हे दैदीप्यमान यश म्हणजे विद्यार्थी, पालक व शिक्षक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सन्माननीय मुख्यध्यपिका सौ. संगीता प्रकाश पाखले यांनी विदयार्थ्यांसाठी वर्षभर आखलेल्या नियोजनाचा व विद्यार्थ्यांच्या मागील बारा वर्षांच्या मेहनतीचा परिपाक आहे. शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भक्कम पाया रचला व विद्यार्थ्यांनी त्यावर कळस चढवला. शिक्षक व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना उत्तुंग यशासाठी वाटचाल करण्यास संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. आशुतोष रामदास येवले व इतर सर्व सन्माननीय संचालकांनी स्वतः जातीने लक्ष घालून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांना प्रोत्साहन दिले.

असे ध्येयवेडे आधारस्तंभ जोवर संस्थेमध्ये आहेत तो पर्यंत के. रा. कोतकर शाळेचे विद्यार्थी यशस्वी होऊन भारत देशाचे आदर्श नागरिक होतील व शाळेचे नाव उंचावतील यात शंका नाही. सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा