*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा अध्यक्ष लेखक कवी श्री पांडुरंग वसंत कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
आत्मचिंतन….
*•••••• प्रेम आणि अहंकार ••••••*
प्रेम प्रदर्शन करीत नाहीं. ते अप्रकट आणि अदृश्य असतं. ते समर्पणात दडलेलं असतं. जाणून घेतल्यावर कळत की ते फार उत्कट आहे.
प्रदर्शन करीत असतो तो अहंकार. आपले अस्तित्व दाखवण्यात अगदी आहे त्यापेक्षा जास्त दाखवण्यात तत्पर असतो तो अहंकार. जेवढं तो देतो त्यापेक्षा जास्त तो दाखवतो. याहून आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे तो जे देतो त्याबदल्यात त्याला काही हवं असतं आणि त्यावर तो अग्रही असतो.
प्रेम याच्या अगदी उलट असतं. देण्यामध्ये त्याला आनंद असतो. ते देणं ही अगदी बिनशर्थ असतं. त्याबदल्यात त्याला काही नको असतं. किती देऊ आणि किती नको अशी त्याची नेहमीची अवस्था असते. ते संपूर्ण समर्पण असतं. देण्यातच त्याला परम आनंद मिळतो. यातच त्याची यथार्थता आणि सार्थकता असते.
अहंकार मात्र व्यक्तीवर अधिकार गाजवतो. प्रेमाला अधिकाराची नव्हे तर समर्पणाची भाषा येते. माझ्यापेक्षाही कुणीतरी मोठा आहे हे मानायला अहंकार कधीच तयार नसतो. त्याउलट प्रेम व्यक्तीला ईश्वर बनवते.
*पांडुरंग कुलकर्णी नाशिक मो. 7769055883*