You are currently viewing पावशी जि. प. मतदारसंघात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न

पावशी जि. प. मतदारसंघात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न

पावशी, डिगस, हुमरमळा, अणाव,आंबडपाल, बांबुळी, बाव, सोनवडे गावांमध्ये बैठक

कुडाळ :

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविले जात असून काल रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात हे अभियान घेण्यात आले. शिवसंपर्क अभियानांर्गत पावशी, डिगस, हुमरमळा, अणाव,आंबडपाल, बांबुळी, बाव, सोनवडे, या गावांमध्ये बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्येक गावात शिवसेना पक्ष संघटना आपल्याला अजून बळकट करायची आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी एकजुटीने शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामे लोकांपर्यत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे.जनतेच्या अडीअडचणींना धावून जाणारा म्हणून शिवसैनिकांची ख्याती आहे. त्यादृष्टीने अधिक जोमाने काम करावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.
यावेळी जि. प. गटनेते नागेंद्र परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव,उपतालुकाप्रमुख बाळू पालव, अतुल बंगे, विभाग प्रमुख दीपक आंगणे, सरपंच बाळा कोरगावकर, सुशील चिंदरकर, बंड्या खोत, रामदास तेंडुलकर, किशोर तवटे, वैशाली पावसकर, सागर भोगटे, प्रसाद शेलटे,
*डिगस* येथे माजी सरपंच दिपक चोरगे, माजी उपसरपंच बाळा पवार, महिला आघाडी विभाग प्रमुख सौ.जान्हवी पवार, महिला संघटक सौ. सोनाली सावंत, बाळा राणे, रामचंद्र सावंत, दशरथ गोसावी, शिवाजी निकम, प्रभाकर झोरे, मंगेश सावंत, दीपक सावंत, सुरज जाधव, मंदार कोठावळे, शुभम शेडगे, श्रुती चोरगे, रितिका सावंत
*हुमरमळा* येथे सरपंच जान्हवी पालव, संचिता पालव, सुनिधी पालव, नाना पालव, यशवंत परब, राकेश पालव, *अणाव* येथे सुनील कुलकर्णी, शाखा प्रमुख बाबा परब. सुधीर पालव, समीर आंगणे, शेखर माळवे, शेखर परब, शिवराम अणावकर, लीलाधर अणावकर, सुंदर आंगणे, *बांबुळी* येथे अजिंक्य मुंडले, सुहास बांबूळकर, मिलिंद परब, शंकर परब, संजय परब, संदीप मयेकर, संजना परब, *बाव* येथे प्रशांत परब, हरिशचंद्र परब,मनोहर टोपले, बाबू आसोलकर, दीपक राऊत, रामदास परब, संदेश सामंत, किशोर परब, *सोनवडे* येथे अजित शिरोडकर, बाबू शिरोडकर, शामसुंदर शिरोडकर,नंदिनी धुरी, वनिता सानेकर, भरत साटेलकर, रमाकांत कोळकर, नाना सावंत, रवींद्र घोगळे, आनंद बळी, *आंबडपाल* येथे सरपंच प्रणिता नाईक, कृष्णा नाईक, विष्णू वंजारे, धीरेंद्र चव्हाण,शाखा प्रमुख प्रसाद नाईक,प्रवीण सावंत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 5 =