पावसा अगोदर रस्त्या लगतच्या धोकादायक झाडांच्या फांद्या तोडा नगरपरिषद व बांधकाम विभागाला आवाहन- रवी जाधव
पावसाळा अगदी जवळ आला आहे वादळी पावसामुळे रस्त्यालगतची जीर्ण झालेली झाड किंवा त्याच्या फांद्या तात्काळ तोडून घ्यावेत असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडी नगरपरिषद व बांधकाम विभागाला रवी जाधव यांनी केले आहे.
वादळी पावसामुळे कित्येक वेळा झाडाच्या फांद्या रस्त्यावर किंवा घरावर पडून अपघात घडले आहेत. असा प्रसंग पुन्हा कोणावरच येऊ नये याकरिता शासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावित शासनाला मदत कार्य करण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आपल्या सोबत नेहमीप्रमाणेच असेल.