माध्यमिक विद्यालय देवसु ओवळीये पारपोलीचा इयत्ता दहावीचा निकाल १००%*
सावंतवाडी
देवसु ओवळीये व पारपोली या तीन गावच्या देवसू माध्यमिक विद्यालय या प्रशालेचा इयत्ता दहावीचा यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा गेली २४ वर्षे कायम राखली आहे या प्रशालेतून प्रथम क्रमांक कु. प्रांजली हेमंत गावकर ८४.२०%, द्वितीय क्रमांक कु.भक्ती सुनील सावंत ७६.६०%, तृतीय क्रमांक कु. सिद्धेश सोपान परब ७४.२०% या विद्यार्थ्यांनी पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.लवू सावंत, उपाध्यक्ष प्रमोद परब ,संस्थेचे सचिव मोहन गवस तसेच सर्व संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक आर. डी. पाटील, सहाय्यक शिक्षिका सोनाली परब, मीना डोंगरे, सिद्धाराम राठोड तसेच ओवळीये ,पारपोली, देवसू ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.