You are currently viewing भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड

भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड

सिंधुदुर्ग :

भारतीय जनता पार्टीकडून आज पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सावंत यांनी २७ ते २८ वर्षांपूर्वी भाजपा युवा मोर्चा पासून कामाची सुरुवात केली. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य त्यानंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस, संघटन सरचिटणीस ही पदे त्यांनी भूषविली. २०२३ मध्ये सिंधुदुर्ग भाजपाचे सिंधुदुर्ग अध्यक्ष झाले. गेली २ वर्षे कुशलपणे संघटना हाताळली. या कार्यकाळात नवीन जुने भेदभाव न ठेवता सर्व कार्यकर्त्यांनचा सन्मान राखण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. तसेच सर्व नेत्यांमधील दुवा बनून सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम केलेच. परंतु समाजातील कि वोटर्स म्हणजेच डॉक्टर, वकील, साहित्यिक, विविध संस्था पदाधिकारी यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, पदवीधर मतदारसंघ या निवडणुकामध्ये भाजपाला भरभरून यश मिळाले व सर्वांच्या मदतीने संघटना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली यात आपण सगळं केले हा अविर्भाव कुठेही नव्हता.

आगामी काळात जिल्हापरिषद, नगरपालिका निवडणुका असून सन्मानीय नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मा नारायणराव राणे, रविंद्र चव्हाण, नितेशजी राणे, अतुलजी कळसेकर, अजितराव गोगटे, प्रमोदजी जठार यांच्या मार्गदर्शना खाली व सर्व सहकाऱ्यानंच्या मदतीने भाजपाला शतप्रतीशत यश मिळवून देतील यात अजिबात शंका नाही भारतीय जनता पार्टी मध्ये जिल्हाध्यक्ष पदी परत संधी मिळणे हे तितकेच महत्वाचे आहे पुन्हा एकदा त्यानां जिल्हाध्यक्ष पदी संधी मिळाली याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा