दहावी परीक्षेत वेंगुर्ले तालुक्याचा ९९.४१ टक्के निकाल…
मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडीची शमिता तळवणेकर ९९ टक्के गुणांनी तालुक्यात प्रथम
वेंगुर्ले
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९.४१ टक्के लागला आहे. वेंगुर्ले तालुक्यातून मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडीची शमिता प्रशांत तळवणेकर या विद्यार्थिनीने ९९ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर तालुक्यातील १९ पैकी १५ हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. वेंगुर्ले तालुक्यातून एकूण ६७९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ६७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९९.४१ टक्के एवढा लागला आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील पहिले दहा मानकरी
१) शमिता प्रशांत तळवणेकर हिने ९९ टक्के – रेडी पार्वती
२) रिया संदिप देसाई हिने ९८.८० टक्के – वेंगुर्ला हायस्कूल
३) दर्शन सुंदर सामंत याने ९५.८० टक्के – अण्णासाहेब देसाई परूळे
४) ऋतुराज मकरंद कोचरेकर याने ९५.६० टक्के – रेडी पार्वती
४) साईश संदिप केरकर याने ९५.६० टक्के – वेतोरे
५) संचिता विजय आंबेरकर हिने ९५.४० टक्के – सिधुदुर्ग विद्यानिकेतन
५) वेदिका मलजी राऊळ हिने ९५.४० टक्के – स.का.पाटील केळुस
५) समिक्षा सुनिल जाधव हिने ९५.४० टक्के – चमणकर हायस्कूल, आडेली
६) प्रणिता प्रभाकर मोंडकर हिने ९५.२० टक्के – सरस्वती टांक
७) दिया ज्ञानेश्वर केळजी हिने ९५ टक्के – सिधुदुर्ग विद्यानिकेतन
८) स्नेथ आशिष परेरा याने ९४.६० टक्के – रेडी पार्वती
९) नुतन रमेश आमडोसकर हिने ९४.२० टक्के – अण्णासाहेब देसाई परूळे
१०) सानिका दिपक पालव हिने ९३.८० टक्के – वेंगुर्ला हायस्कूल
११) विष्णू चंद्रकांत सावंत यांनी ९३.८० टक्के – वेंगुर्ला हायस्कूल
१५ हायस्कूल चा निकाल तालुक्यात शंभर ट