दहावीच्या निकालात कोकण अव्वल…
कणकवली
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात कोकण विभागाने राज्यात अव्वल स्थान राखले आहे. दहावी परीक्षेत कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के लागला आहे. तर राज्याचा एकूण निकाल ९४.१० टक्के एवढा लागला आहे.
यंदा मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यभरात २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत विभागनिहाय निकाल पुढील प्रमाणे आहे. पुणे -९४.८१ टक्के, नागपूर- ९०.७८ टक्के, संभाजीनगर- ९२.८२ टक्के, मुंबई-९५.८४ टक्के, कोल्हापूर- ९६.७८ टक्के, अमरावती-९२.९५ टक्के, नाशिक- ९३.०४, लातूर-९२.७७, कोकण-९८.८२ असा आहे.