वेंगुर्लेत ३१ जानेवारीला जिल्हास्तरीय स्वच्छता विषयक पोस्टर स्पर्धा

वेंगुर्लेत ३१ जानेवारीला जिल्हास्तरीय स्वच्छता विषयक पोस्टर स्पर्धा

वेंगुर्ला

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान, तुळस सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथे सकाळी ९.३० वा. जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वच्छता व श्रमदान कार्यक्रम अंतर्गत स्वच्छता विषयक जागृतीसाठी सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी १६ x १२ इंच आकाराच्या कागदावर पोस्टर बनवायचे असून जलरंगांचा वापर करणे आवश्यक आहे.

सदर पोस्टर स्वच्छता जनजागृतीपर चित्र व स्वच्छता विषयक स्लोगनचा समावेश असावा. पोस्टर स्पर्धा विषयाला अनुसरून रफ स्केचचा वापर करण्यास हरकत नाही. स्पर्धेसाठी कागद पुरविण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख सातशे, पाचशे व तीनशे रुपये, तसेच प्रत्येकी मेडल आणि उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकसाठी मेडल व प्रमाणपत्र आणि सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. सचिन परुळकर ९४२१२३८०८३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने उपाध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा