मालवणमध्ये भव्य रकमेच्या बक्षिसांची क्रिकेट स्पर्धा..

मालवणमध्ये भव्य रकमेच्या बक्षिसांची क्रिकेट स्पर्धा..

मालवण
बाबा परब मित्र मंडळाच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रकमेच्या बक्षिसांची खुली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 17, 18, 19, 20 मार्च रोजी बोर्डिंग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघास तब्बल 2 लाख 75 हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघास 1 लाख 50 हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संपूर्ण थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनल वर प्रसारित करण्यात येणार आहे. या स्पर्धेची घोषणा आज बाबा परब यांनी भाजपा तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली या स्पर्धेसाठी नियोजन समिती गठीत करण्यात आली असून याच्या अध्यक्षस्थानी नितीन मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा