You are currently viewing माजी उपनगराध्यक्षांच्या घरी चोरीचा प्रयत्न

माजी उपनगराध्यक्षांच्या घरी चोरीचा प्रयत्न

माजी उपनगराध्यक्षांच्या घरी चोरीचा प्रयत्न

परप्रांतीय कामगारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी गार्डनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा घरात घुसून चोरीचा अयशस्वी प्रयत्न; सतर्कतेमुळे टळला अनर्थ

सावंतवाडी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान नजीक असलेल्या माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरी मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला. रात्री सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रयत्न झाला ..चोरट्याने कोरगावकर यांच्या घरातील साहित्य विस्कळीत केले. सौ. कोरगावकर यांचे पती प्रसाद कोरगावकर यांना चाहूल लागताच ते बाहेर आले. आणि त्यांनी गार्डनमधील एका परप्रांतीय व्यक्तीला चोरी करताना पाहिले. प्रसाद कोरगावकर यांनी त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो टेरेसवरून दोन मजले खाली उडी मारून पळून गेला.प्रसाद कोरगावकर, अखिलेश कोरगावकर आणि अवधूत नाटेकर यांनी तत्काळ पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. शिव उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी लावलेल्यांच्यातील हा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी त्याला सकाळी त्याच्या माणसांकडे सोपवले, अशी माहिती मिळाली आहे.या घटनेनंतर सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी गार्डनमध्ये काम करणाऱ्या सर्व परप्रांतीय कामगारांचे ओळखपत्र (डॉक्युमेंट्स) आणि गार्डनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व खेळण्यांचे फिटनेस तपासूनच परवानगी देण्याची मागणी केली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळ होऊ नये आणि मुलींना गार्डनमध्ये परप्रांतीयांपासून भीती वाटू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा