You are currently viewing तारकर्ली ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी कोरोनां संक्रमण रोखण्यासाठी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या उपोषणास भारतीय जनता पार्टी चा पाठिंबा 

तारकर्ली ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी कोरोनां संक्रमण रोखण्यासाठी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या उपोषणास भारतीय जनता पार्टी चा पाठिंबा 

–  बाबा मोंडकर जिल्हा प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग

कोरोनां संक्रमण रोखण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे सरकार ला अपयश आले असून पालकमंत्री श्री .उदय सामंत पूर्णपणे निष्क्रिय ठरले आहेत.यां विषयी ग्रामपंचायत सदस्य डॉ. श्री. जितेंद्र केरकर यांनी ग्रामसमिती सदस्य पदाचा राजीनामा देऊन कोरोना संक्रमण रोखण्यास अपयशी सरकार विरोधात मालवण तहसीलदार कार्यालय येथे दिनांक१७/६/२०२१ ला उपोषण करणार आहेत जिल्हा भाजपाचा त्यांना पाठिंबा आहे.या उपोषणाच्या माध्यमातून ते जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींना येणाऱ्या अडचणींचे प्रातिनिधित्वं करत आहेत.
रुग्णसंख्या वाढत असताना जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीना कौरौनाग्रस्त नागरिकाना ग्रामविलगिकरण करण्याचे ठाकरे सरकारने आदेश देऊन रुग्णांना वाऱ्यावर सोडले आहे ढासळलेली आरोग्यव्यवस्था रोज वाढत जाणारा म्रुत्युदर ,वाढणारी कोरोना रुग्ण संख्येने जिह्यातील नागरिकांनां जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.वास्तविक असा आदेश काढण्याअगोदर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत जिल्हापरिषद,पंचायत समिती सदस्य यांना विश्वासात घेऊन त्यांच्या आरोग्य विषयी सूचना लक्षात घेऊन तसेच आवश्यक असलेल्या वैद्यकिय औषध, मशीन उपकरणे,टेस्टिंग किट उपलब्ध करून ग्रामविलगिकरणाचा निर्णय घेणे गरजेचे होते तसे न झाल्याने जिल्ह्यातील कोरोना दिवसे दिवस वाढत आहे. तरी पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी दखल घेऊन जनतेस आपेक्षित निर्णय घ्यावा अशी मागणी श्री बाबा मोंडकर जिल्हा प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =