लॉकडाऊन ते अनलॉक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लॉकडाऊन ते अनलॉक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण

मालवण मधील कु. समीर वझे याने लॉकडाऊन काळात रेखाटलेली विविध चित्रे माजी मुख्याध्यापिका तथा लेखिका सौ.मेघना संजय जोशी यांनी लिहिलेल्या कविता यांचे एकत्रित प्रदर्शन प्रजासत्ताक दिनी मेघना जोशी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला मालवणातील कलाप्रेमी व साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कु. समीर व सौ. जोशी यांचे कौतुक केले. मालवण मधील डॉ. राहुल वझे व डॉ. राजेश्वरी वझे यांचा राहुल हा मुलगा असून त्याने लॉकडाऊन काळात मिळलेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून विविध प्रकारची १०० चित्रे रेखाटली. यात सौ.मेघना जोशी यांनी विविध कविता रचल्या. राहुल याची १०० चित्रे व सौ. जोशी यांच्या २१ कवितांचा समावेश असणारे हे लॉकडाऊन ते अनलॉक हे प्रदर्शन १२१- वन टू वन – संवाद चित्रातल्या मित्राशी अशी टॅगलाईन देऊन प्रजासत्ताक आयोजित करण्यात आले होते. ध्वजवंदन करून व राष्ट्रगीत म्हणून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी सर्वेश परुळेकर व विनिता पांजरी या कलाकारांचे सहकार्य लाभले. या प्रदर्शनाला मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी भेट देत समीर याने लॉकडाऊन काळाचा सकारात्मक विचार करून त्याचा केलेला सदुपयोग व रेखाटलेली चित्रे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच सौ. जोशी यांच्या कवितांचेही कौतुक नगराध्यक्षानी केले. या प्रदर्शनाला नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, यतीन खोत, नगरसेविका पूजा करलकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, शिला गिरकर, सेजल परब, दर्शना कासवकर, भाई कासवकर, जॉन नरोना, स्मृती कांदळगावकर, महेंद्र पारकर, अमेय देसाई आदी व इतर कलाप्रेमी, साहित्यप्रेमी नागरिकांनी भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा