ओटवणे येथे तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
सावंतवाडी
ओटवणे येथील मकरंद खेमदास नाईक (वय २४) या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मागील तीन वर्षांपासून तो मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याचे डॉ. लेले यांच्याकडे उपचार सुरू होते. सध्या तो डॉ. पाटकर यांच्याकडून उपचार घेत होता.
आज सकाळी १०.३० वाजल्यापासून मकरंद बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता, वाडीतील विहिरीजवळ त्याची चप्पल आढळून आली. खात्री करण्यासाठी विहिरीत पाहिले असता, तो मृत अवस्थेत मिळून आला.
या घटनेमुळे ओटवणे गावात शोककळा पसरली आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.