सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीत प्रथमच ५ दिवसांच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शास्त्रशुद्ध योग मार्गदर्शन घेऊन इच्छुक नागरिकांनी, दि. २ मे २०२५ ते ०६ मे २०२५ वेळ सकाळी ६:०० ते ८:०० या कालावधीत आंबोली, मुळवंदवाडी (गुरववाडी) उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
यावेळी योगामधील विविध पदव्या संपादन केलेले योगतज्ज्ञ एकनाथ गुरव – AMc/YSA/ YAN/ YSs Diksha / MSc in Yoga science ,भरत गावडे – BSc/MSc in yoga science , प्रशांत गुरव – BSc/MSc in yoga science, कुणाल गावडे – BSc in yoga science , अक्षय गुरव – BSc/MSc in yoga science, प्रियांका गुरव – YIC उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या भव्य योग आणि आरोग्य शिबिरात योगासन आणि प्राणायाम , रोग प्रतिकार शक्ती वाढ, योगा थेरपी ,निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन,तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन,सात्विक आहार अशा विविध विषयांवर तज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे या शिबिरासाठी फक्त २००/-प्रवेश शुल्क आकारले असून आंबोली, चौकुळ, गेळे परिसरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
प्रवेश नोंदणीसाठी ८४११९६५९४८, ९४२११९१४७०, ९६३७८००४५६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.