सावंतवाडीत १५ मे ला आरिवर्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…
सावंतवाडी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व कामगार कल्याण केंद्र, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ मे ला जिमखाना मैदान येथील कामगार कल्याण केंद्र येथे आरिवर्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या प्रशिक्षण शिबिराचा जास्तीत-जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याण केंद्र सावंतवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख नम्रता आराबेकर 9421264800 यांच्याशी संपर्क साधावा.