You are currently viewing इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 19 ऑगस्ट रोजी विशेष बैठक

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 19 ऑगस्ट रोजी विशेष बैठक

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 19 ऑगस्ट रोजी विशेष बैठक 

सिंधुदुर्गनगरी

इतर मागास बहुजन कल्याण विभागसिंधुदुर्ग यांच्या मार्फत इतर मागासवर्गविशेष मागास प्रवर्ग तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावीपात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा तसेच समाज विकासासाठी कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संस्थांना योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी बुधवारदि. 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

            ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनसिंधुदुर्ग येथील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी आरक्षित समाज महासंघाचे सर्व पदाधिकारीसदस्य तसेच समाज विकासासाठी कार्यरत विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहनइतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा