You are currently viewing डामरे गावामध्ये कृषी मेळावा संपन्न

डामरे गावामध्ये कृषी मेळावा संपन्न

कणकवली :

 

कणकवली तालुक्यातील डामरे गावामध्ये कै. राजाराम मराठे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर कृषी कन्यांनी कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलाने व स्वागताने झाली. यावेळी कृषी कन्यांनी कृषी मेळाव्याचे उद्दिष्ट पटवून दिले. प्राचार्य मा.श्री.पंकज संते सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी कृषी कार्यानुभव व इतर कृषी विषयक घटकांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.वारंग सरांनी आंबा व काजू या फळझाडांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच ग्रामस्थ विजय सावंत, संदीप साटम व अशोक पेडणेकर यांनी कृषी विषयक आपले अनुभव व्यक्त केले. डॉ.शिरसाट यांनी विविध पशुधनातील योजनेबद्दल माहिती दिली.

या कृषी मेळाव्याचे एकात्मिक शेती पद्धतीचे व सेंद्रिय शेतीचे कृषीकन्यांनी सादर केलेले मॉडेल हे मुख्य आकर्षण ठरले. यानंतर शाळेतील मुलांना बक्षीसांचे वाटप केले. कृषी मेळाव्यातील विविध साहित्यांबद्दल कृषिकन्यांनी माहिती दिली. यानंतर सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाला गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी कन्या ऐश्वर्या ठाकूर, श्रेया पाटील, अंकिता चव्हाण, अदिती कांबळे, प्रीती कांबळे, प्रमिता रायपुरे,श्वेता जाधव, प्रतीक्षा कोठावळे, गौरी कोरे यांनी केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा