You are currently viewing परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवारी 4 मे रोजी कोकण विभागीय स्नेह वधू वर मेळावा

परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवारी 4 मे रोजी कोकण विभागीय स्नेह वधू वर मेळावा

परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवारी 4 मे रोजी कोकण विभागीय स्नेह वधू वर मेळावा

सावंतवाडी

श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी कोकण विभागीय स्नेह वधू वर मेळावा सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे होत असून या मेळाव्याची पूर्ण तयारी झालेली आहे माननीय श्री शांताराम भाऊ कदम वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्रातून इतर वरिष्ठ मंडळी या मेळाव्या .करिता उपस्थित राहणार असून गोवा बेळगाव सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागातून परीट समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत यामुळे पूर्ण कोकण विभागात परीट समाजातील सर्व बांधवांसाठी एक पर्वणी हा मेळावा ठरणार आहे तसेच परीट समाजातील सकाळच्या सत्रात संत गाडगेबाबा प्रतिमेचे पूजन मान्यवरांचा सत्कार मान्यवरांचे विचार मार्गदर्शन होणार असून हा मेळावा यूट्यूब च्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळणार आहे या अगोदर गेली दोन महिने समाज बांधवांच्या माध्यमातून याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्यामुळे याची चर्चा सिंधुदुर्ग बरोबरच पूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे .दुपारी स्नेहभोजन झाल्यानंतर वधू वर परिचय मेळावा होणार आहे याकरिता मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे एकंदरीत भव्य दिव्य असे स्वरूप या मेळाव्याला प्राप्त होणार असून किमान दोन ते अडीच हजार परिट समाज बांधव या मेळाव्यास उपस्थित राहणार आहे या मेळाव्याच्या माध्यमातून वरिष्ठांचे मार्गदर्शन बहुमोल ठरणार आहे याकरिता सर्व समाज बांधव यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आणावी असे आवाहन मा श्री दिलीप जी भालेकर जिल्हाध्यक्ष श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने पत्रकारांशी बोलताना सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा