You are currently viewing भाजपा नेते चिडीचूप… मुख्यमंत्री करताहेत संयमाने दुसऱ्या लाटेचा सामना

भाजपा नेते चिडीचूप… मुख्यमंत्री करताहेत संयमाने दुसऱ्या लाटेचा सामना

शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर

गेले काही महिने महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे मुंबई,पुणे, नागपूर सह संपूर्ण महाराष्ट्रराज्याला कोविड साथीच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेतून वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करत असताना दररोज दिवसातून दोन दोन वेळा टिका करणाऱ्या भाजपचे राज्यातले आणि जिल्ह्यातले नेते आता चिडीचूप झालेले दिसून येत आहेत. अशी टीका शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली.

महाराष्ट्रात सत्तापालट होऊन रात्रीच्या अंधारात सरकार स्थापन करण्याची दिवास्वप्नं पाहणाऱ्या भाजपची आता पुरती गोची झालेली आहे.

ज्या उध्दवजी ठाकरे साहेबांवर हीन दर्जाची टिका करणाऱ्या भाजप नेत्यांचे दात खऱ्या अर्थाने घशात गेलेले आहेत.
कारण ज्या संयमाने आणि धीरोदात्तपणे मुख्यमंत्र्यांनी या दुसऱ्या लाटेचा सामना केला त्याचे कौतुक आज देशभर होत आहे.
पंतप्रधानांसह देशातील अनेक मुख्यमंत्र्यांनी कोविड साथरोग नियोजनाच्या “महाराष्ट्र माॅडेल” ची स्तुती केलेली आहे.
अनेक राज्यांत हे माॅडेल राबविण्यात येण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे.

उलटपक्षी आता भाजपची सरकारं असलेल्या उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश,गोवा, कर्नाटक अशा राज्यांमध्ये हाहाकार उडालेला असून मृत्यूचे तांडव सुरू आहे.

अनेक मृत्यू लपवले जात आहेत आणि प्रेतं गंगेत विसर्जित केली जात आहेत.
गोवा राज्यात तर गेले काही दिवस दररोज रात्री ऑक्सिजन अभावी वीस बावीस रुग्णांचे मृत्यू एकट्या गोवा मेडिकल कॉलेज हाॅस्पिटलमध्ये होत आहेत.
वीस लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गोवा राज्यात कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेच्या अतिढिसाळ नियोजनामुळे होत असलेल्या सामान्य जनतेच्या मृत्यू वरून भाष्य करताना शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही भाजप नेता दिसत नाही ही आश्चर्याची बाब आहे. याकडे डॉ. परूळेकर यांनी लक्ष वेधले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 10 =