You are currently viewing ”धामापूर कासारटाका” संघ ठरला “हिंदूह्रदयसम्राट चषक २०२१” चा मानकरी

”धामापूर कासारटाका” संघ ठरला “हिंदूह्रदयसम्राट चषक २०२१” चा मानकरी

आ. वैभव नाईक, संजय पडते, नागेंद्र परब यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण

कुडाळ

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून विकसित झालेल्या कुडाळ शहरातील भव्य क्रिडांगणावर आयोजित केलेल्या हिंदूह्रदयसम्राट चषक २०२१ चा विजेता धामापूर कासारटाका संघ ठरला. तर हार्दिक स्पोर्टस्, कुडाळ या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं. विजेत्या धामापूर कासारटाका संघाला आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जि.प.गटनेते नागेंद्र परब यांच्या हस्ते रोख रु.२३०२३/- व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपिठावर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उपांत्यफेरीच्या पहिल्या सामन्यात हार्दिक स्पोर्टस्, कुडाळ संघाने एम.आय.डी.सी., कुडाळ संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, दुसरा उपांत्य सामना टी.टी.एम.एम.(अ), कुडाळ आणि धामापूर कासारटाका या दोन संघात झाला. या सामन्यात धामापूर कासारटाका संघाने टी.टी.एम.एम. कुडाळ संघावर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.


अंतिम सामन्यात हार्दिक स्पोर्टस् संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५ षटकांत ५६ धावा जमवल्या. प्रत्यूत्तरादाखल खेळताना धामापूर कासारटाका संघाने ५७ धावांचं लक्ष्य ३.३ षटकांतच पुर्ण केलं. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या धामापूर कासारटाका संघाच्या गणेश कुबल याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर संपूर्ण मालिकेत सातत्यपुर्ण कामगिरी करणारा हार्दिक स्पोर्टस् संघाचा कर्णधार रुपेश तांडेल याला मालिकावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी करणारा हार्दिक स्पोर्टस् संघाचा सोहेल शेख उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरला. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरेश कांबळी, उत्कृष्ट यष्टीरक्षक पुरस्कारासाठी टीटीएमएम संघाच्या रुपेश धुरी तर अंतिम सामन्यात दोन उत्कृष्ट झेल घेणाऱ्या कासारटाका संघाच्या बंटी याची उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड करण्यात आली.
या स्पर्धेचं आयोजन व नियोजन युवानेते रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजू गवंडे, राम राऊळ, टीटीएमएम क्रीकेट क्लब, कुडाळ यांनी केलं. या स्पर्धेत निवेदक म्हणून बादल चौधरी, राजा सामंत, सुनिल करवडकर यांनी तर, स्कोरर म्हणून घाडी गुरुजी, राजन राठूळ यांनी काम पाहिलं.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजेश महाडेश्वर, मितेश वालावलकर, कृष्णा तेली, शंकर पाटकर, नितीन सावंत, बाळा पावसकर, सुशिल चिंदरकर, गोट्या चव्हाण, रुपेश कांबळी, अनुप चेंदवणकर, रुपेश धुरी, प्रसाद जळवी, रवी जळवी, वाॅल्विन सोज, रोहित आटक, नितीन सोलकर तसेच टीटीएमएम क्रीकेट क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + sixteen =