You are currently viewing आंदोलनच्या इशाऱ्याची बांधकाम विभागाने घेतली दखल

आंदोलनच्या इशाऱ्याची बांधकाम विभागाने घेतली दखल

पाडलोस पुलाच्या रस्त्याचे काम पूर्णत्वास

बांदा

मडुरा-पाडलोस समीवर सुरू असलेल्या कालव्याच्या पुलावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून काम अखेर पूर्णत्वास आले. शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी पंधरा दिवसांची आंदोलनासंदर्भात दिलेली डेटलाईन बांधकाम विभागाने पाळून वाहनचालक, प्रवाशांसाठी पूल निर्धोक केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मडुरा रेल्वे स्टेशनजवळ बांदा शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे कालव्याच्या कामासाठी सुस्थितीत असलेला चांगला रस्ता उखडण्यात आला. पुलाचे काम पूर्ण होऊन सुद्धा याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक अपघातही घडलेत. परंतु झोपी गेलेले प्रशासन जागे होत नसल्याने उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी सर्वाभिमूख आंदोलन छेडण्याचा लेखी इशारा दिला होता. याची दखल घेत पुलावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा