पोभुर्ले येथे गुरुवार 17रोजी वारस तपास शिबिर
मालवण:
शासनाच्या जिवंत 7/12 मोहिमेंतर्गत मौजे पोंभुर्ले व मालपेवाडी येथील मयत खातेदार यांचे वारस तपास करणेसाठी गुरूवार दिनांक 17/4/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय पोंभुर्ले येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा तसेच मयत खातेदार यांच्या वारसांनी येताना मयताचा मृत्यू दाखला,अर्जदार यांचे 2 फोटो व आधारकार्ड घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन पोंभुर्ले सरपंच प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, तलाठी सुनीता मेस्त्री यांनी केले आहे
