You are currently viewing पाडलोस ग्रामसचिवालयाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू….

पाडलोस ग्रामसचिवालयाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू….

पं. स. सदस्य रेश्मा नाईक यांनी केली पाहणी

बांदा

पाडलोस ग्रामसचिवालय इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. बांधकाम पूर्णत्वास येण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून यासाठी आपण पंचायत समिती तसेच आमदार, खासदार यांच्यामार्फत अतिरिक्त निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन, पंचायत समिती सदस्य रेश्मा नाईक यांनी दिले. ग्रामसचिवालयाचे बांधकाम पाहणीदरम्यान ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, इंजिनीअर शिंदे आदी उपस्थित होते. ग्रामसभांना होणारी जागेची कमतरता, ग्रामस्थांना होणारी अडचण लक्षात घेऊन शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी पाठपुरावा करत जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून जि. प. सदस्य राजन मुळीक यांच्या सहकार्याने ग्रामसचिवालय मंजूर करून आणले. ग्रामसचिवालय पूर्णत्वास येण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांनीही निधी देणार असल्याचे भूमिपूजनावेळी सांगितले. परंतु अजूनही निधीची आवश्यकता असल्याचे राजू शेटकर यांनी रेश्मा नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वरील अतिरिक्त निधी देणेसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन रेश्मा नाईक यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 11 =