सावंतवाडी रोटरी क्लबच्या वतीने युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव..

सावंतवाडी रोटरी क्लबच्या वतीने युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव..

सावंतवाडी

मुंबई स्थित एक रुग्ण सावंतवाडी येथील डॉ. राजेश नवांगुळ यांच्या यशराज हॉस्पिटलमध्ये रक्तस्त्राव झालेल्या अवस्थेत गंभीर स्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी त्या रुग्णाचा ट्युमर काढणे अत्यंत महत्वाचे होते.त्यासाठी रक्ताच्या चार बाटल्यांची आवश्यकता होती. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रक्तदानाचे कार्य करणाऱ्या सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी तात्काळ आवश्यक रक्ताची व्यवस्था केल्यामुळे एकाचे प्राण वाचले.या महान कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब,सावंतवाडीच्या वतीने देव्या सूर्याजी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच यापुढेही भविष्यात असेच महान कार्य आपल्या हातून घडण्यासाठी ईश्वर आपल्याला निरोगी व दीर्घायुष्य आणि आनंदी जीवन लाभो अशा शुभेच्छा देव्या सूर्याजी यांना देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा