You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण जाहीर

सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण जाहीर

सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण जाहीर

बॅरिस्टर नाथ पै सभागृहात पार पडली आरक्षण सोडत प्रक्रिया

सावंतवाडी

जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सावंतवाडी तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, तहसिलदार श्रीधर पाटील, नायब तहसीलदार श्रीमती सविता कासकर – तारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण प्रक्रिया पार पडली. कळसुलकर प्राथमिक शाळेची दुसरीतील विद्यार्थिनी आरोही अमित अरवारी हिच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली.

यावेळी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार सावंतवाडी तालुक्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्ग २, अनुसूचित जाती २, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ८, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुले ९, सर्वसाधारण महिला २१ तर सर्वसाधारण २१ जागांसाठी सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले.

यात अनुसूचित जाती (अ.जा.) महिला प्रवर्गासाठी कलंबिस्त, सोनुर्ली गावांमध्ये आरक्षण पडले असून अनुसूचित जातीसाठी कुणकेरी व तिरोडा ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

तर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात इतर मागासवर्गासाठी (ना.मा.प्र.महिला ) प्रवर्गासाठी दांडेली, आंबेगाव, चौकुळ, कास, आरोंस, सरमळे, कवठणी, निगुडे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग खुले आरक्षण

नाणोस, सातार्डा, कोलगांव, वेत्ये, माजगांव, असनिये, केसरी फणसवडे, पडवे माजगांव, मळगांव या ग्रामपंचायतींसाठी जाहीर करण्यात आले आहे.

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी इन्सुली, आंबोली, मळेवाड, नेमळे, सांगेली, ओटवणे, न्हावेली, शिरशिंगे, मडुरा, तळवणे, डिंगणे, डेगवे, वाफोली, विळवडे, देवसू दाणोली, भालावल, ओवळीये, गुळदूवे, पारपोली, किनळे व गेळे ग्रामपंचायत साठी आरक्षण जाहीर झाले आहे.

तर उर्वरीत बांदा, तळवडे, आरोंदा, कारिवडे, माडखोल, चराठे, निरवडे, आजगाव, शेर्ले, तांबोळी, वेर्ले, सातुळी बावळाट, भोमवाडी, सावरवाड, सातोसे, धाकोरे, नेतर्डे, पाडलोस, साटेली तर्फ सातार्डा, रोणापाल व कोनशी दाभिळ येथे सर्वसाधारण गटासाठी खुले आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

या आरक्षण प्रक्रियेवेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी सरपंच दत्ताराम पेडणेकर, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, वाफोली उपसरपंच विनेश गवस, मळगाव माजी सरपंच निलेश कुडव, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, पारपोली उपसरपंच संदेश गुरव, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, वेर्ले माजी सरपंच पंढरी राऊळ, साटेली उपसरपंच सहदेव कोरगावकर, तळवणे सरपंच गोविंद केरकर, किनळे सरपंच दीपक नाईक, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, सदस्य जितेंद्र गावकर, सांगली सरपंच लवू भिंगारे, भोमवाडी सरपंच अनुराधा वराडकर, उपसरपंच मायकल फर्नांडिस, तळवडे सरपंच ज्ञानेश्वर जाधव, माडखोल माजी सरपंच संजय शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सावंत, ओटवण्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश गावकर, माजगाव ग्रा.प. सदस्य मधु कुंभार, रोणापाल ग्रा.प. सदस्य योगेश केणी, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्यासह विविध सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा