You are currently viewing काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या मनीकांत राठोडवर गुन्हा दाखल करावा..

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या मनीकांत राठोडवर गुन्हा दाखल करावा..

वैभववाडी तालुका काँग्रेसची मागणी*

अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी भारतीय जनता पार्टीचे चित्तापुर(कर्नाटक) विधानसभेचे उमेदवार मनीकांत राठोड यांनी दिली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून मनीकांत राठोड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम आहे. कर्नाटकात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मा.खर्गे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका संभवतो.
भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचा उमेदवार निवडणुकीच्या काळात अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष यांना जीवे मारण्याची धमकी देतो ही अत्यंत गंभीर बाब असून मनीकांत राठोडवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी तक्रार वैभववाडी तालुका काँग्रेसच्या वतीने वैभववाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खंडागळे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी वैभववाडी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर, वैभववाडी पंचायत समितीच्या माजी मभापती मीनाताई बोडके,तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर, श्रेया मुद्रस, दिलीप नारकर, दस्तगीर नाचरे,प्रविण रोग्ये इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा