You are currently viewing पणदूर महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

पणदूर महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठा येथे ग्रंथालय विभागामार्फत राष्ट्रीय ग्रंथपाल दिन व डॉ. एस .आर. रंगनाथन जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे उपाध्यक्ष श्री शशिकांत अणावकर यांनी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस . आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. सचिन वासकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. सुशांत वालावलकर यांनी केले.यावेळी पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना श्री सिद्धिविनायक पुस्तकपेढी मधून मिळालेल्या पुस्तकांचे अकादमीचे उपाध्यक्ष श्री. शशिकांत अणावकर सर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘ तरुणाई आणि पुस्तक’ या विषयावर ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली.

या कार्यक्रमाला महाविद्यालय ग्रंथालय समितीचे सर्व सदस्य, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डी. व्ही. गावडे यांनी केले तर प्रा. तृप्ती कोकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − sixteen =