You are currently viewing “संस्कारांच विद्यापीठ, भागवत दांपत्य”

“संस्कारांच विद्यापीठ, भागवत दांपत्य”

“संस्कारांच विद्यापीठ, भागवत दांपत्य”
(शिक्षकदिन विशेष)

A dream begins with a teacher who believes in you,Who tugs and pushes and leads you to the next plateau.Sometimes poking you with a sharp stick called “truth’
आज शिक्षकदिन, भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस.५ सप्टेंबर १८१८ यादिवशी जन्मलेले आदरणीय राधाकृष्ण हे अत्यंत बुध्दीवंत आणि तल्लख राजकारणी म्हणून ओळखले जातात. शिक्षण आणि ज्ञान या दोन गोष्टीमुळे माणूस, कुटुंब आणि समाज प्रगल्भ होत असतो.हा विचार त्यांनी त्या काळात प्रभावीपणे मांडला..आणि यात शिक्षकांची भूमिका ही फार महत्त्वाची असते.अशा देशाच्या माजी राष्ट्रपतींचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून देशभर साजरा होतो.

शिक्षक या घटकाचे महत्त्व थोर जागतिक शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती आदरणीय अब्दुल कलामसाहेब यानी वेळोवेळी अधोरेखित केलेले आहे.राष्ट्रपती पदाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांनी दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले होते की,यानंतरचा माझा सर्व वेळ एक शिक्षक बनून ज्ञानार्जनाचे काम करणण्यासाठी खर्च करेन..नव्हे ते माझ्या आवडीचे काम असेल”…अर्थात ज्ञानार्जन करत असतानाच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

पूर्वी शिक्षक या घटकांकडे विद्यार्थीच नव्हे तर सारा समाज एका आदरयुक्त नजरेने पहात असे..परिस्थिती बदलली..अवघ्या जगाचं ज्ञान एका सेंकदात एका क्लीकवर गुगलवर मिळू लागल.राजकीय, सामाजिक संदर्भ झपाट्याने बदलले.संस्कृतीवर अतिक्रमण झालं.रूढी,परंपरा, संस्कारही झपाट्याने झालेल्या जागतिकिकरणामुळे बदलले..आदरणीय “गुरुजींची”जागा “सरानी”घेतली.

शिक्षक म्हणून नियुक्ती देताना पात्रता,त्यात असलेला टोकाचा राजकीय हस्तक्षेप, शासकीय स्तरावरील समाजातील महत्वाच्या घटकांबाबत असलेली अनास्था, यामुळे दिवसेंदिवस हा घटक भरडला जात आहे..पण अशाही परिस्थिती काही अपवाद म्हणून खऱ्या अर्थाने समाजाच्या जडणघडणीत कार्यरत असणारे शिक्षक आजही आपल्याला अनुभवायला मिळतात.
आदर्श शिक्षक कसा असावा याच मी घेतलेली अनुभूती म्हणजे “भागवत दांपत्य”..जेष्ठ साहित्यिक आदरणीय स्व.विद्याधर भागवत सर आणि जेष्ठ लेखिका आदरणीय स्व.उषाताई भागवत. यावेळी मला साने गुरूजींचा प्रकर्षाने उल्लेख करावासा वाटतो.ते म्हणायचे,शिक्षक या घटकाकडे समाज नेहमीच डोळसपणे पहात असतो.अशा शिक्षकांच्या ताब्यात पालकं आपलं मुलं जेव्हा लहानपणी पाठवतात तेव्हा ते मुलं म्हणजे मातीचा गोळा असतो.या मातीच्या गोळ्याची सुंदर मुर्ती घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात..

साने गुरूजींना अपेक्षित असलेला शिक्षक मला भागवत दांपत्यात पहायला मिळाला.लहान मुलांच मानसशास्त्र समजून घेऊन मुलांशी वागण्याच त्या काळातील त्यांच कसब वाखाणण्याजोग होत.प्रतिकूल परिस्थितीत दळवळणाची कोणतीही साधन नसताना मैलोनमैल पायपीट करुन व.प्रसिद्धीपासून दुर राहून विद्यादानाचं पवित्र कार्य भागवत दापत्यानं पार पाडल.दोघानीही सेवानिवृत्तीनंतरही साहित्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाच काम सुरु ठेवलं…आता शिक्षक ही संकल्पना बदलली..शिक्षणाचं झपाट्याने बाजारीकरण झालं.भौतिक सुखाची कल्पना,जीवघेणी स्पर्धा, पालकांच्या आपल्या पालकांकडून असलेल्या अवांतर अपेक्षा यामुळे शिक्षक हा घटक एका वेगळ्याच संकटाला सामोर जात आहे…

जेव्हा शिक्षक या संकल्पनेचा विचार हा राष्ट्रनिर्माणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदु म्हणून केला जाणार नाही तोपर्यंत ही शिक्षणक्षेत्रातील आताची नकारात्मकता अशीचं रहाणार. अशावेळी भागवत दांपत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे..कारण भागवत दांपत्य हे संस्कारांच विद्यापीठ होत..
आजच्या शिक्षक दिनानिमित्त आमच्या तमाम शिक्षक बंधूभगिनीना अभिवादन..

Happy Teachers day…
अँड.नकुल पार्सेकर..
अध्यक्ष- अटल प्रतिष्ठान

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 3 =