मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण. . .

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण. . .

मुंबई :

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कारोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले आहे. कोणताही लक्षण नसताना त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतल्याचे ट्विट मधे म्हटले आहे. किशोरी पेडणेकर या सातत्याने कोरोना संकटाच्या काळात अतिशय सक्रिय होऊन काम करत होत्या. एप्रिल महिन्याच्या दरम्यान त्यांनी बी. वाय. नायर रुग्णालयाला आणि टी. एन. वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली होती. कोरोना व्यवस्थापनासाठी मदत करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला होता.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की मी covid-19 चाचणी करून घेतली आहे ही सकारात्मक आली कोणतेही कारण नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरण केले आहे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा