शिवसेनेने जाळला अभिनेत्री कंगना रणावतचा पुतळा

शिवसेनेने जाळला अभिनेत्री कंगना रणावतचा पुतळा

शिवसेनेने जाळला अभिनेत्री कंगना रणावतचा पुतळा

कुडाळ / पूनम राटूळ :

मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करीत कंगणा राणावतचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

कंगणा राणावतने मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, नगरसेवक श्रेया गवंडे, पं.स. सदस्य मथुरा राऊळ, स्नेहा दळवी, सुशील चिंदरकर, गोट्या चव्हाण, बाबी गौरव, दीपक सावंत, भुपेश चेंदवणकर, बबन बोभाटे, कृष्ण तेली आदी शिवसैनिक व पदाधिकारी यांनी एकत्र येत कंगना रणावतचा पुतळा जाळला व मुंबई आणि पोलिसांबाबत केलेल्या कंगनाने केलेल्या वक्तव्याचा करण्यात आला निषेध केला. यावेळी कंगना विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा