विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांची राष्ट्रवादी लीगल सेलच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नेमणूक

विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांची राष्ट्रवादी लीगल सेलच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नेमणूक

कणकवली 

तालुक्यातील प्रसिद्ध तरुण विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांनी  आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश कार्यक्रम कलमठ येथे पार पडला.

या प्रवेशानंतर ॲड. प्राजक्ता शिंदे (विधीतज्ञ) यांना कणकवली युवती तालुकाध्यक्षपदी व राष्ट्रवादी लीगल सेलच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आलेली आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, अल्पसंख्याक सेल जिल्हा कार्याध्यक्ष नजीरभाई शेख, प्रदेश सरचिटणीस सरफराज नाईक, व्यापारी सेल महिला जिल्हाध्यक्ष चित्रा देसाई, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष सुंदर पारकर, कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, उपाध्यक्ष मंगेश दळवी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शफीक खान, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अल्पसंख्याक सेल सावंतवाडी तालुका कार्याध्यक्ष हिदायत तुल्ला खान, युवक तालुकाध्यक्ष कणकवली सागर वारंग, जयेश परब, सतीश जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा