You are currently viewing अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रमात ९ मे ते १३ मे दरम्यान व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन.

अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रमात ९ मे ते १३ मे दरम्यान व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन.

अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रमात ९ मे ते १३ मे दरम्यान व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन.

कणकवली

अद्वैत फाऊंडेशन कणकवलीच्या वतीने राष्ट्रसेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबीर गोपुरी आश्रम, वागदे येथे ९ मे ते १३ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. साने गुरुजींच्या समतेच्या आणि मानवतेच्या शिकवणीचे संस्कार या शिबिरात केले जातात. कवायत, लेझिम, झांज, पथनाट्य, एरोबिक्स , कॅलेथानिक्स, ग्रेट भेट आदी उपक्रमासह धम्माल गप्पागोष्टींच्या माध्यमातून हसत खेळत शिबिरार्थींच्या मनात समता मानवता आणि बंधुतेचे विचार रुजवले जातात. शिबिराचे हे आठवे वर्ष असून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ असणार आहेत.

अधिक माहितीसाठी सरिता पवार मोबा. ९४०३२९६६९४, राजन चव्हाण मोबा. ७०३८८३४३५६ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा