जगातल्या पहिल्या तीन क्रमांकात भारत देश पोहोचेल एवढी क्षमता वाढवण बंदरात
*बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत अभ्यासपूर्ण माहिती
* वाढवन बंदराच्या विकासासाठी 26 टक्के वाटा राज्य सरकारचा
*वीस मीटरचा ड्राफ्ट असलेले वाढवण बंदर हे देशातील एकमेव
विधानसभा
वाढवण बंदराच्या विकासा मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचा 26 टक्के वाटा आहे. उर्वरित वाटा हा केंद्र सरकारचा आहे. या बंदराचा ड्राफ्ट वीस मीटर एवढा आहे. जो आपल्या देशात अन्य कोणत्याही बंदरात एवढा ड्राफ्ट नाही. त्यामुळे या बंदराच्या विकासानंतर भारत देश जगात पहिल्या तीन क्रमांकावर पोचण्यास मदत होईल असे विश्वासपूर्ण उत्तर राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिले.
आमदार जयंत पाटील यांनी वाढवण बंदर आणि रस्ते विकास या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी बोलताना मंत्र नितेश राणे म्हणाले ,नॅशनल हायवे च्या माध्यमातून तसेच उद्योग विभागाच्या माध्यमातून या भागात रस्ते विकास केला जात आहे. जेएनपीटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात आहे. तिसरी मुंबई उभी करण्यासंदर्भात ही सरकारची महत्त्वाची भूमिका आणि मोठ्या प्रमाणात विकास केला जात आहे. या संदर्भात संबंधित खात्याचे मंत्री योग्य पद्धतीने उत्तर देत आहेत. मात्र त्याचवेळी वाढवण बंधरामुळे अधिक विकासाची गती वाढणार आहे. आणि देशही जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकापर्यंत नेण्याची क्षमता या वाढवण बंदराची आहे.अशी माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिली.